Vihang Books Store
स्वाध्याय-प्रणेते पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी.
-
'धर्मावरची जळमटं दार कशी करायची? Haves आणि Have nots यांना प्रेमानं एकत्र कसं बांधायचं? त्यांच्यात विजिगीषू वृत्ती कशी निर्माण करायची? हे करायचं असेल तर मला प्रबळ प्रवाहाच्या विरुद्ध पोहावं लागेल!' पू. पांडुरंगशास्त्री आठवले
भगवद्गीतेवरील अद्वितीय कादंबरी
सुमारे साडेपाच सहस्र वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णानं ऐन रणांगणावर सांगितलेलं त्रिकालाबाधित असं श्रेष्ठ तत्त्वज्ञान या कादंबरीत सहजसुंदर शैलीत मांडलं आहे. देशी-परदेशी वाचक-समीक्षकांनी गौरवलेली ही प्रत्ययकारी कादंबरी.
मूळ महाभारतावर आधारित (भांडारकर आवृत्ती/नीळकंठी आवृत्ती आणि इतर १०० संदर्भग्रंथ) महाभारताचा एक अनोखा अनुभव देणारी, सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या जीवनावरील चित्तथरारक कादंबरी.
₹525 / Buy - Hard copy ebook Audio book
ऋचिक, जमदग्नी आणि परशुराम या तीन पिढ्यांचा इतिहास सांगणारी आणि प्रामुख्यानं भगवान परशुरामांच्या जीवनावरील प्रत्ययकारी कादंबरी.
₹450 / Buy - Hard copy Audio book
ज्या ऋषींनी स्वयंप्रज्ञेनं 'शुक्ल-यजुर्वेद निर्माण केला त्या याज्ञवल्क्य ऋषींच्या जीवनावरील आशयसमृद्ध, विचारसमृद्ध, अद्भुतरम्य कादंबरी.
₹425 / Buy Hard copy Audio book
पितामह भीष्माचार्यांच्या जीवनावरील अनेक नवे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारी रससिद्ध कादंबरी
शक्तीऋषीने कल्माषपाद राजाला शाप देऊन एक क्रूरकर्मा राक्षस जन्माला घातला; तर विश्वामित्रांनी हाच राक्षस वसिष्ठ-कुलाचा उच्छेद करण्यासाठी पोसला... आणि सुरू झालं एक भीषण नाट्य!
मित्रावरुण ते पराशर मुनी एवढा कालखंड रेखाटणारी थरारक, रससिद्ध कादंबरी
जगन्माता मार्कंडेयांच्या अंतरंगातून त्या शिल्पात प्रवेश करत्या झाल्या. प्रचंड ध्वनी कडाडला. धरणीकंप झाल्यासारखं झालं. तो अखंड पाषाणस्तर उत्तरदिशेला चिरला गेला. मार्कंडेय मागच्या बाजूस फेकले गेले. त्यांनी स्वतःला सावरलं. सप्तशिखरांच्या त्या अतिविशाल पर्वतावर जगन्मातेचं कायमचं प्राकट्य झालं होत. जगन्मातेचं ते स्थान होतं - ते आद्य शक्तिपीठ होतं. शक्तिपीठांच्या स्थापनेवरील, मार्कंडेय ऋषींच्या जीवनावरील रंजक कादंबरी
'कृष्ण' या नावातच विलक्षण जादू आहे. अनेक आव्हानं त्याच्या अवतारी जीवनात आली. संकटावर मात कशी करावी याचा वस्तुपाठच त्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिला. अनेक आव्हानांना तोंड देताना कृष्ण कधी रडला नाही. म्हणूनच त्याचं जीवन आणि तत्त्वज्ञान माणसाला हास्य प्रदान करतं. त्याच्या लीला भाविकांना परमानंद देतात; आणि जीवन समृद्ध बनवतात. अशी ही ओघवत्या शैलीत लिहिलेली कृष्णकथा! भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावरील वास्तवदर्शी कादंबरी
देव हे परग्रहावरील अतिमानव होते? अवकाशयानांचे दिवे पाहून यानांच्या चालकांना देव म्हटलं गेलं होतं का? देवांसंबंधात ऋग्वेद, रामायण, महाभारत, योगवासिष्ठ, समरांगण सूत्रधार इत्यादी प्राचीन ग्रंथांमधे कोणते पुरावे लपले आहेत? इंका, माया, सुमेरियन, इजिप्शियन आणि भारतीय संस्कृती देवांच्या पृथ्वीवरील वास्तव्याचे कोणते पुरावे देतात? सप्तलोकाचं स्वरूप कसं आहे? मृत्यूनंतरचं जीवन कसं आहे? या आणि अशा अनेक विषयांच्या अभ्यासातून सिद्ध केलेलं सर्वस्वी अनोखं पुस्तक.
स्वाध्याय-प्रणेता पू. पांडुरंगशास्त्री आठवले जी के जीवन-विचार पर आधारित 'देह झाला चंदनाचा' इस उपन्यास का गुजराती अनुवाद
भग्वदगीतेचे सिद्धान्त हे त्रिकालाबाधित आहेत. प्राप्त जीवन कसं समृद्धपणे जगावं आणि आपला सर्वतोपरी उत्कर्ष कसा साधावा याचं गीता मार्गदर्शन करते. गीता तत्त्वज्ञान धर्माधर्मातीत आहे. या ग्रंथासाठी गीतेवरील जवळपास ५० टीकांचा संदर्भ घेतला आहे. सरळ-सोपी बोली भाषा हे या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. अनेक नवे अर्थ, वेदोपनिषदांमधील संदर्भ, विज्ञान, खगोलशास्त्र, पुरातत्वशास्त्र, परमानसशास्त्र, पुराणकथा, दृष्टांत कथा यांचा अंतर्भाव या ग्रंथात केला आहे.
₹525 / Buy Hard copy Audio book
तथाकथित ब्रिटिश विद्वानांनी भारताचा प्राचीन इतिहास हेतूपुरस्सर बदलला. त्यासाठी चंद्रगुप्त मौर्याला अलेक्झांडरच्या समकालीन दाखवून बनावट इतिहासाचा ओनामा केला. भारताच्या दहा हजार वर्षांच्या खर्या राजकीय इतिहासाचा साधार आराखडा मांडण्याचा या पुस्तकाद्वारे प्रयत्न केला आहे.
भारताच्या दहा हजार वर्षांच्या सांस्कृतिक इतिहासाचा आढावा. या दुसऱ्या खंडात पुराणातील भाकड कथा आणि इतिहास वेगळा करून दाखवला आहे. हिंदू धर्माचं मूळ स्वरूप, इतिहास पुरुषांवर झालेल्या टीकेची चिकित्सा, ललित वाङ्मयाचं संशोधन आणि परामर्श इत्यादी गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. थोडक्यात मनुस्मृतीपासून कामसूत्रापर्यंत आणि वैदिक वाङ्मयापासून चावट साहित्यापर्यंत सगळं काही यात आहे. भारताच्या सांस्कृतिक सामरस्याचं रहस्य या ग्रंथात उलगडून दाखवलं आहे.
आशिया खंडातील वैदिक संस्कृतीच्या विस्ताराचा इतिहास... कंबोडियापासून श्रीलंकेपर्यंत आणि सिंगापूरपासून फिलिपाइन्सपर्यंतच्या प्रदेशात किमान दोन हजार वर्षं वैदिक हिंदू राजांच्या राजवटी होत्या. उझबेकस्तानापासून चीनपर्यंत आणि इंडोनेशियापासून कोरिया-जपानपर्यंत भारतीय संस्कृतीचा आणि संस्कृत भाषेचा प्रभाव सर्वत्र पसरला होता, हे आपल्या पाठ्य-पुस्तकांमधून फारसं सांगितलं जात नाही. इंग्रजांच्या आणि कम्युनिस्टांच्या प्रभावाखालील भारतीय राज्यकर्त्यांनी दीर्घकाळ दडवलेला हा गौरवशाली इतिहास या पुस्तकामधून साधार मांडायचा प्रयत्न केला आहे.
प्रतिदिनी वाचन-चिंतन-मननासाठी अनेक संदर्भ घेऊन लिहिलेला ग्रंथ. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी ऐन रणांगणावर अर्जुनाला हे गीताकथन केलं आणि ‘कोहऽम’ ते ‘सोऽहम्’ हा परामार्ग प्रकाशित केला. मानवाचं सर्वार्थानं उन्नयन करणारं हेच गीतातत्त्वज्ञान 365 दिवसांमधे अनेक संदर्भग्रंथांचा आधार घेऊन सांगितलं आहे. स्व-विकासासाठी तसंच गीतेच्या अभ्यासकांसाठीसुद्धा हा ग्रंथ उपयुक्त आहे.
ज्येष्ठ कवी, गीतकार गंगाधर महाम्बरे यांनी लिहिलेल्या पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या सान्निध्यातल्या आठवणी. Remenaries.
नल-दमयंती कथानकावरील, प्राचीन भारतातील एका अद्भुतरम्य पर्वतावरील कादंबरी. Beautiful story of king Nala and Damayanti from the Mahabharat.
स्वाध्याय-प्रणेता पू. पांडुरंगशास्त्री आठवले जी के जीवन-विचार पर आधारित 'देह झाला चंदनाचा' इस उपन्यास का गुजराती अनुवाद
प्रचंड प्रयत्नशील असणारा यति ते सहजसमाधीत अवतीर्ण झालेला सिद्ध यांच्यातला प्रवास समजावून सांगणारं पातंजल योगशास्त्र हे आचरणाचं शास्त्र आहे- पाठांतराचं नव्हे! ते गांधर्वीय ज्ञान आहे; मानवी नव्हे! ते उत्क्रांतीचं शास्त्र आहे!! आथर्वण गंधर्वाने पतंजली मुनींना उपदेशिलेलं अवघ्या विश्वाला एकाच माळेत गुंफणारं हे सूत्र आहे.
योगमार्गाचं शास्त्रशुद्ध आचरण कसं करावं हे सांगणारं अभ्यासपूर्ण पुस्तक.
सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी आचार्य चाणक्य तथा कौटिलियांनी चंद्रगुप्त मौर्यांच्या नवनिर्मित राज्याची घटना तयार केली. त्यामधे आय-व्ययासह राज्याच्या सर्व नीतिनियमांचा विचार केलेला आहे. ती प्राचीन राज्यघटना सांगतानाच डॉ. कल्याण कुलकर्णी यांनी या अभ्यासपूर्ण पुस्तकात आधुनिक भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधात तौलनिक अभ्यास मांडला आहे.
परमेश्वराच्या कर्ताकरविता, जगन्नियंता या कल्पनेचं वास्तवच अमान्य केलं तर...? तर मग पृथ्वीवर होणारी उलथापालथ, जन्म-मरण, युद्ध-संहार आणि पुनर्निर्माण करणारा खरा कोण? देव आणि मर्त्य लोकांमधील संघर्ष रेखाटणारी अद्भुत कादंबरी
संत तुकाराम महाराजांच्या जीवनावरील भावपूर्ण कादंबरी
झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी / A novel on the life of Rani Lakshmibai of Zansi
मला माहीत असलेले साधुसंत / द. म. खेर
भारतातील सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या अपरिचित अशा अनोख्या साधुसंतांचे/योग्यांचे थक्क करणारे प्रत्यक्षदर्शी चमत्कार/अनुभव
The Silent Reformer / Rajendra Kher
Translated by Prakash Joshi
English translation of the book: 'Deha Zala Chandanacha' on the life of Rev. Pandurang Shastri Athavale, founder of Swadhyay Pariwar. Biographical novel.
Translated by Prashant Talnikar
Supernatural Thriller / Thrilling chase to acquire the mysterious object ends at Bindu Lake! Till reaching there ‘pilgrims’ get many mysterious, enigmatic experiences. They have to cross three gates on three different planes. Crossing each gate leads them into a different kind of land - spectacular in their imagery.
संस्कृत सुभाषितांमधील मूळ कथा - श्लोक-तात्पर्यासहित. size: double crown
Moral stories for teenagers from ancient Sanskrit scriptures.
संतवृंद SantaVrunda / द. म. खेर - भा. द. खेर
१९६० साली वोरा अँड कंपनी या प्रकाशन संस्थेनं एक संत चरित्रमाला प्रकाशित केली होती. त्यामध्ये नऊ संतांची वेगवेगळी चरित्रं होती. त्यातील पाच संतचरित्रं या पुस्तकात एकत्रित करून हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. यामध्ये श्री बीडकर महाराज, श्री माधवनाथ महाराज, सिद्धारूढ स्वामी, श्री माणिकप्रभू आणि श्री गुलाबराव महाराज या संतवृंदांची जीवनं आणि त्यांचे अलौकिक चमत्कार नोंदवले आहेत. भाविक वाचकांना ही चरित्रं नक्की आवडतील.
खजुराहोची शिल्पे म्हणजे शिल्पकलेचा अप्रतिम आविष्कार! त्या मंदिरांच्या निर्माण कार्याशी आणि चंदेल वंशाशी जोडलेली एक दंतकथा सांगितली जाते. त्या मंदिरांच्या परिसरात ती दंतकथा ऐकल्यापासून मनात भावनांची आवर्तनं उठली. त्या कथेतील अद्भुताचा अंश काढून टाकताच डोळ्यासमोर एका संवेदनशील स्त्रीचा जीवनपट उलगडू लागला. तो या कादंबरीत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
गुरु कैलास परिक्रमेला जायचं ठरवतो. बरोबर येण्यासाठी काही खास मित्रांनाही आग्रह करतो. आठ जणांच्या त्या गटात गुरुवगळ्ता कुणीच कुणाला ओळखत नसतं. प्रवासाला सुरुवात होते आणि हळुवारपणे प्रत्येकाच्या अव्यक्त आठवणींचा खजिना उघडत जातो. 'अव्यक्त' हा कैलास परिक्रमेदरम्यान उलगडत गेलेला असाच आठवणींचा खजिना आहे. वेगवेगळ्या पदावर काम करणाऱ्या तरुणांनी रुटीनमधून बाहेर पडून आपल्या मनात दडून ठेवलेल्या आठवणींचा खजिना वाचकांपुढे रिता केला आहे.
'अडगुळं मडगुळं सोन्याचं कडगुळं...' आदी आठवणीतील हृद्य बालगीते/बडबडगीते / Songs for kids
पारिजातक Parijatak / जयंत जोगळेकर
श्रीकृष्णाच्या विविध विवाहांच्या रसभरित कथा. The stories of Krishna's weddings.
शब्दांचे मनोवेधक अंतरंग / मनोहर भिडे
भाषेच्या अभ्यासकांसाठी उपयुक्त पुस्तक. वेदकाळ, ग्रीकसंस्कृती, संस्कृत-हिब्रूपासून निघालेल्या अनेक शब्दांची व्युत्पत्ती, शब्दांची कुळकथा, बोलीभाषा, लिपी यांचा अभ्यासपूर्ण तौलनिक अभ्यास या पुस्तकात मांडला आहे.